डॉक्टर मुखर्जीना ८ मे १९५३ रोजी सकाळी ८. ३० वाजताच्या रेल्वे ने दिल्ली हुन काश्मीर कडे त्यांच्या इतर पंजाबी साथीदारांसोबत पॅसेंजर रेल्वेने घेऊन चाललेले , डॉक्टर मुखर्जीने आपण कश्यासाठी चाललोय या कोणत्याच गोष्टीचे भान नव्हते पूर्ण अज्ञानी मनाने ते काश्मीर कडे कूच करत होते. ते ज्या रेल्वे च्या डब्या मध्ये बसले होते, त्यांच्या सीट पूर्ण फुलांच्या गुच्छांनी आणि जन संघ च्या झेंड्यानी सुशोबित केले होते. गुरु दत्त वैद्य , अटल बिहारी वाजपेयी, टेक चांद, बलराज मधोक आणि इतर असे त्याचे भक्तगण त्यांच्या साथीला होते. गाडी स्टेशन मधून निघण्याच्या आधी त्यांनी एक वक्त्यव्य केले कि त्यांचा जम्मू ला जाण्याचा उद्देश हा शेख अब्दुल्ला ने काश्मीर च्या नागरिकांना केलेल्या दडपशाहीच्या विरोधात सुरु केलेल्या प्रजा परिषदेचे कार्य आणि त्याच्या मर्यादा याचा आढावा घेणे या अति महत्वाच्या काम साठी ते निघाले आहेत असा होता.
डॉक्टरांना जम्मू मध्ये प्रवेश नाकारला आणि त्याचे कारण सांगताना डॉक्टर म्हणाले कि” पं नेहरू हे सातत्याने जाहीर करत आहेत कि जम्मू काश्मीर मधील विनापरवाना प्रवेशाचे काम १०० % पूर्णत्वास आले आहे . तरीही हे समजून घेणे अवघड आहे कि कोणाही व्यक्तीला भारत सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय जम्मू मध्ये प्रवेश का दिला जात नाहीये ? हे परमिट तिथल्या कम्युनिस्ट लोकांसाठीही लागू आहे ज्यांचे नेहमीच व्यवसाय किंवा काही काम निम्मिताने जम्मू आणि काश्मीर मध्ये येणे जाणे होते. परंतु भारतीय एकता आणि राष्ट्रवादाच्या दृष्टीने विचार किंवा कार्य करणार्यांना ही प्रवेशिका बंद आहे.
डॉक्टर मुखर्जी नी त्याच्या शब्दात त्यांचा जम्मू ला जाण्याचा मूळ उद्देश सांगितलं की , ” माझा जम्मू ला जाण्याचा शुद्ध हेतू हा होता कि मी स्वतः हे जाणून घेऊ शकतो कि जम्मू ची सध्या परिस्थिती काय आहे आणि तिथे कश्या पद्धतीने राजकीय घडामोडी चालू आहेत. मी प्रजा प्ररिषदेच्या बाहेर तिथल्या स्थानिक नेते लोकांना भेटू शकतो, जे ववेगवेगळ्या राजकीय उद्धेशासाठी काम करत आहेत. जम्मु लोकांचा हेतू काय आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल, आणि हे सर्व जाणून घेण्याचा माझा शेवटचा प्रयत्न असेल ज्याचा फायदा फक्त जम्मू लोकांनाच नाही तर संपूर्ण भारतालाही होईल.
डॉक्टर मुखर्जीना ज्या जागी बंधिस्त म्हणून ठेवण्यात आले होते ती जागा एका छोट्या झोपडी सारखी होती जी एका जेल मध्ये बदलण्यात अली होती. हि जागा श्रीनगर पासून काही किलोमीटर वर निशात बाग म्हणून ओळखण्यात येते. हा प्रदेश डाल लेक आणि हिमालय पर्वताच्या सखोल उतारावर वसलेला आहे. या प्रदेशा पर्यंत नुसते पायानी चढून जाणे शक्य नाही, आणि डॉक्टर मुखर्जीना नक्कीच त्यांच्या गुडघ्याच्या असह्य वेदना सहन करत तो उभा पर्वत चालून जावे लागले असणार. डॉक्टर मुखर्जीने बंदिस्त केलेली जागा १० बाय ११ ची छोटी रूम होती, आणि त्यांच्याच बाजूला सारख्या आकाराच्या रूम मध्ये त्यांचे सहकारी गुरु दत्त वैद्य आणि टेक चांद यांना बंदिस्थ करण्यात आले होते. त्या रूम इतक्या लहान होत्या कि त्यात चोथ्या माणसाला जागा होणे अशक्य होते
ज्या वेळी १९ जुन ला पंडित प्रेमनाथ डोग्रा यांना या जेल मध्ये बंदिस्थ करण्यासाठी आणण्यात आले त्या वेळी या झोपडीला थोडे पुढे कंपाऊंड मध्ये पत्रे ठोकावे लागले. बाकी पूर्ण कंपाऊंड हे फळ आणि फुल झाडे यांनी भरलेले होते फक्त एक टेनिस कोर्ट एवढा भाग मोकळा ठेवण्यात आला होता, जेणेकरून हे बंदिस्त थोडा वेळ तिथे मोकळे फिरू शकतील. शहरापासून हे ठिकाण साधारण ८ मैल वर होते आणि तिथे व्यवस्तिथ अशी कोणतीही वैदकीय सेवा पुरवण्यात आली नव्हती. अत्यंत गरजेच्या वेळी जेंव्हा ड्युटी वर असेल पोलीस डॉक्टरांना कळवतील त्याच वेळी ते तिथे येत असत. साधारण १०० यार्ड वर एक कॅनल होते आणि वॉटर सब सेक्शन होते जिथून फोन करण्याची सोय होती. या जंगलात पण तो फोन एक आशेचा किरण होता फक्त त्यांचा उपयोग ऑफिस अवर्स मध्ये होत होता. फक्त एकाच वर्तमानपत्र हिंदुस्थान टाइम्स हा देण्यात येत होता कालांतराने हिंदुस्तान टाइम्स ऑफ कलकत्ता हि देण्यात यायला लागला . वर्तनपत्र पोहोचवणारा कधी वेळेत किंवा २-३ दिवस उशिरा असा त्याच्या मर्जीने येत होता. कोणासाठी आलेले पत्रं हे ऑफिस सुप्रीटेंडेंट स्वतः घेऊन यायचा आणि तो आलेल्या पत्रांबाबतीत नेहमी साशंक आणि कठोर असायचा.
साधारणतः कोणतेही पत्र श्रीनगर ला पोचायला एक आठवडा लागायचा आणि जर ते बंगाली मध्ये लिहिलेले असेल तर सुप्रीटेंडेंट अधिकच साशंक होत होता. अशी काही पत्र आहेत जी कलकत्ता मधून १० जुन ला पोस्ट झाली आणि १२ किंवा १३ जून ला श्रीनगर ला पोचली पण, ” पोचली नाहीत (undelivered)” असा शेरा मारून डॉक्टरांच्या मृत्यू नंतर परत पाठवण्यात आली. या संदर्भात ऑफिसर ने स्पष्टीकरण दिले कि जी पत्र डॉक्टरांसाठी बंगाली मध्ये येतात ती तपासणार माणूस नेहमी उपलब्ध नसतो म्हणून ती पोचायला वेळ लागतो, त्या ऐवजी त्यांनी पत्र हि फक्त इंग्लिश मध्ये लिहलेली असावीत आणि फक्त त्यांच्या कुटुंबियांकडून आलेली असावीत आणि त्यात कोणताही राजकीय संदर्भ नसावा जेणेकरून ती तपासण्याची गरज पडू नये असा आदेश दिला. पण त्याच्या ह्या आदेशाचा काहीच उपयोग झाला नाही उलट त्याला हि त्याची सर्व वयक्तिक पत्रे शेख अब्दुल्लाच्या तपासणीदाराकडून तपासून घ्यावी लागली.
कितीही भयानक प्रकारची वागणूक भारतीय लोकसभेत विरोधी नेत्याची भूमिका बजावणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला देण्यात होत होती.
मधोक सांगतात कि अशी कितीतरी पत्र आहेत जी डॉक्टरांनी लिहिलेली किंवा त्यांना आलेली दडपली गेली आहेत , आणि त्या नंतर शेख अब्दुल ने असा हुकूम काढला कि त्यांच्या आदेशा शिवाय कोणतीही अतिरिक्त सेवा किंवा मदत हि डॉक्टर मुखर्जीना देण्यात येणार नाही. त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांना किंवा मित्रांना त्यांना भेटता येणार नाहीत जो पर्यंत ते जेल मध्ये आहेत. डॉक्टरांचा मोठा मुलगा अशुतोष याने भारत सरकार कडे जम्मू ला जाऊन डॉक्टरांना भेटण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता पण तो पर्यंत नियमात बदल होऊन असे अर्ज जम्मू आणि
काश्मीर सरकार कडे करावे लागत असे आणि तेच त्यांना मान्यता देत असत. आणि साहजिकच अशुतोष चा अर्ज फेटाळला गेला , डॉक्टरनाचे काही नातेवाईक त्या वेळी जम्मू मध्ये होते त्यांनीही त्यांचा भेटण्याचा अर्ज केला पण तो हि नाकारला गेला . अश्या परिस्थितीत फक्त एक व्यक्ती त्यांना भेटू शकली ती म्हणजे सरदार हुकूमत सिंग ज्यांचा त्यांना भेटण्याचा उद्देश हा पूर्ण राजकीय होता आणि दुसरे म्हणजे बॅरिस्टर उ.म. त्रिवेदी ज्यांनी त्यांचे वकील म्हणून काम पहिले. मधोक ने पुढे असे सांगितले कि. एका अर्धवट ज्ञानी असलेल्या साधू ला त्यांना भेटण्याची संधी दिले ज्याने त्यांना मारहाण केली आणि डॉक्टरांच्या मृत्यू नंतर असे दाखवण्यात आले होते कि जम्मू सरकार डॉक्टरनं भेटण्याची परवानगी सगळ्यांना देत होते.
२४ मे रोजी पं नेहरू आणि डॉकटर काटजू यांनी विश्रांती साठी जम्मू ला भेट दिले होती पण नेहरू त्यानं कधीही भेटले नाहीत आणि त्यांनी आपले बंधिस्त लोक कसे आहेत कश्या अवस्थेत , आहेत याची विचारपूस सुद्धा केली नाही. नंतर डॉक्टरांच्या मृत्यू नंतर पंडितजींनी समर्थन केली कि , “त्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना सांगण्यात आले कि डेल लेक मध्ये ते सर्व चित्रात असणाऱ्या व्हीला मध्ये अतिशय आरामदायी जीवन जगात आहेत. ” फक्त असा नेहरूंना निरोप मिळणे हे नेहरूंसाठी काफी होते आणि त्यांनी त्या वर विश्वास ठेवला होता.
No comments:
Post a Comment