Sunday, 20 December 2020

साठेखत

 साठेखत (Agreement to sale )


कोणतेही अचलीत स्थावर मालमत्ता विकत घेताना आपण खुप विचार करून घेतो जसे कि लोकेशन चांगले आहे का, फ्लॅट हवेशीर आहे का अश्या मूलभूत गोष्टींबरोबर प्रॉपर्टी आपण कोणत्या अटी आणि शर्तींवर घेतो हे जास्त महत्वाचे आहे. मग ती प्रॉपर्टी नवीन असो किंवा जुना फ्लॅट आपण विकत घेत असू. विकणारा आणि खरेदी करणारा हा कोणत्या तरी टर्म्स वर प्रॉपर्टी विकायला किंवा खरेदी करायला तयार झालेला असतो. याच बोली (oral) अटी आणि शर्ती जेंव्हा आपण फायनल सेल डीड बनवण्याच्या आधी मान्य करतो त्याला साठेखत असे म्हणतो (Agreement to sale ).

मालमत्ता हस्तांसतरण कायदा, १८८२, कलम ५४ मध्येल 'विक्री' ची व्याळख्यां नमुद आहे. मालमत्ता हस्तांतर कायद्याप्रमाणे कोणत्याही मिळकतीचे साठेखत किंवा करारनामा याद्वारे हस्तांतरण होत नाही.

फ्लॅट चे फायनल सेल डीड बनवण्याच्या आधी साठेखत बनवणे गरजेचे असते त्या मध्ये कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स वर आपण फ्लॅट खरेदी करणार आहोत या गोष्टी नमूद केलेल्या असतात. खरेदीखत बनवताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे साठेखत बनवताना लागतात. साठेखत मधील खालील  काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत-


१) नाव, पत्ता , मोबाइलला नंबर दोन्ही पार्टी चा. 


२) प्रॉपर्टी चे निर्देशन, प्रॉपर्टी चे जुने रेकॉर्ड , title search , इत्यादी


३)कोणत्या कारणासाठी प्रॉपर्टी विकणार आहे, प्रॉपर्टी वर काही लोन, बोझवार किंवा काही कायदेशीर कारवाई चालू असेल तर त्याचा मजकूर.


४) खरेदीदार कश्या आणि किती वेळात ठरलेली रक्कम परत करणार याचा तपशील.

५) विक्रेता प्रॉपर्टी सोबत कोणत्या कोणत्या सोइ सुविधा देणार आहे याचा मजकूर.


६) किती कालावधी मध्ये प्रॉपर्टी चे बांधकाम पूर्ण होईल किंवा जुन्या प्रॉपर्टी साठी किती वेळात किंवा किती रक्कम परत केल्यावर मालमत्ता हस्तांतरण होईल याची माहिती असणे गरजेचे आहे.


७) मालमता हस्तांतर करताना कोणते कोणते कागदपत्र हस्तांतरण होईल याची माहिती.


८) जर दोन्ही पार्टी मध्ये काही वादावादी झाले तर कायदेशीर तरतुदी काय आणि कोणत्या स्वरूपात असतील याची माहिती असणे गरजेची  आहे.


९) कॉन्ट्रॅक्ट चंचल करण्याच्या तरतुदी आणि त्याच्या अटी आणि शर्ती यांची माहिती असणे गरजेचे आहे.


१०)स्टॅम्प ड्युटी, रेजिस्ट्रेशन फीस याची किती रक्कम भरावी लागेल याची माहिती असणे गरजेचे असते.


साठेखत मध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्याच गोष्टी या सेल डीड मध्ये असणे गरजेचे आहे. साठेखतात एक लिहिले आहे आणि शेवटी खरेदीखत मध्ये वेगळेच clause आहेत हे कायद्याने मान्य नाही. असे जर आढळले तर खरेदीदार खरेदीखता वर सही करण्यास मनाई करू शकतो किंवा कॉन्ट्रॅक्ट नाकारू शकतो आणि दिवाणी न्यायालयात त्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. रेरा अंतर्गत हि या मध्ये कारवाई होऊ शकते.


म्हणूनच साठेखत हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे किंवा आपण म्हणूं शकतो कि साठेखत हे खरेदीखताचा आरसा आहे. एकदा खदेखत झाले कि साठेखत आपोपापच डिसमिस किंवा त्याची व्हॅलिडिटी संपून जाते. 


सध्या साठेखत किंवा करारनाम्यास मालमत्तेच्या किंमतीप्रमाणे पूर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते. ज्या मालमत्तेचे साठेखत केले जाते त्याच मालमत्तेबाबतचे खरेदीखत केले तर पुढे असे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क खरेदीखतासाठी भरावे लागत नाही.

साठेखत अनोंदणीकृत असेल तर गाव दप्तरी त्याची नोंद घेता येणार नाही.  जर साठेखत नोंदणीकृत असेल तरीही त्यादची नोंद ‘इतर हक्क’ सदरी नोंदविता येईल. फक्तअ नोंदणीकृत खरेदी खतामुळेच अधिकारांचे हस्तां तरण होऊ शकते.




© Expert Legal Forum

No comments:

Post a Comment

कायदेविषयक प्रश्न - ३ घरघुती हिंसाचारामुळे गर्भधारणा संपुष्टात किंवा गर्भ वैद्यकीय मदतीने पाडता येतो का ?

कायदेविषयक प्रश्न - ३  घरघुती हिंसाचारामुळे गर्भधारणा संपुष्टात किंवा गर्भ वैद्यकीय मदतीने पाडता येतो  का ? सिद्रा मेहबूब विरुद्ध महाराष्ट्र...