Wednesday, 6 January 2021

कॉपीराइट कायदा आणि नोंदणी

 

 कॉपीराइट कायदा-

मनुष्य आणि  प्राणीमात्रा मधे  फरक काय आहे हा प्रश्न विचारल्यावर  आपले लगेच उत्तर येते - मनुष्य विचार करतो , आपले विचार प्रकट करतो.   सध्या आपले विचार प्रकट करण्याचे उत्कृष्ट साधन म्हणजे सोशल मीडिया , आपण लिहिलेले लेख , कलाकारी अन्य लोकांपर्यंत पोचवी  म्हणून आपण फेसबुक , व्हाट्सअप्प किंवा अन्य मीडिआ  साधनांचा वापर करतो आणि काही दिवसांनी लक्षात येते कि आपला लेख, विडिओ चोराला गेला आहे , कोणीतरी स्वतःच्या नावाने ते  फिरवत आहे . ह्या तर छोट्या गोष्टी झाल्या असं वाटाय पण गाणी, गाण्याच्या टून्स , ऍडव्हर्टिसिमेंट मॅटर ह्या सगळ्याची चोरी होताना दिसते . हे कायद्याच्या आधाराने कास थांबवता येईल तर कॉपीराइट ऍक्ट च्या मदतीने .. काय आहे कॉपीराइट ऍक्ट त्याचा कसा वापर होऊ शकतो ...

कोणत्या प्रकारचे काम आपण कॉपीराइट ऍक्ट च्या अंतर्गत रजिस्टर करू शकतो -

भारता मध्ये खालील प्रकाचे काम कॉपीराइट ऍक्ट अंतर्गत रजिस्टर करू शकतो-

१) संगीतामधील काम ( MUSICAL WORK)

२) साहित्यिक काम - पुस्तक किंवा मनुस्क्रिप्ट लिहिणे ( BOOK WRITTEN/ MANUSCRIPT)

३) छायांकन चित्रपट-( Cinematography)

 ४) फॅशन डिझाईन,

५) चित्रांप्रमाणे कलात्मक कामे- ( ARTISTIC WORK)

६) ओरिजिनल परफॉर्मन्स

७) सॉफ्टवेअर आणि इतर संगणक प्रोग्राम आणि संकलन इ.

*तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की कॉपीराइट शीर्षक, नावे, कल्पना, संकल्पना, घोषणा, पद्धती आणि लहान वाक्यांशांचे संरक्षण करीत नाही.*

  

*आपल्याला कॉपीराइट ची का जरुरत आहे -*

जेंव्हा आपण मूळ काम (ORIGINAL WORK ) करत असतो तेंव्हा ते आपल्या नावावर नोंद झाले असते पण ते आपल्याच नावावर राहावे कोणी दुसर्याने त्याची चोरी करू नये ह्या साठी कॉपीराइट करून घेणे महत्वाचे असते . उदाहरणार्थ - तुमि एक तुमच्या कल्पनेतून पैंटिंग केले आहे आणि ते तुमि तुमच्या वेब साईट  वर किंवा सोशल मीडिया वर पोस्ट केले आणि काही दिवसानंतर दुसऱ्या व्यक्तीने ते स्वतःच काम म्हणून त्यातून पैसे कमावले तर तुमि कॉपीराइट कायद्या अंतर्गत त्या व्यक्तीला कोर्टात खेचु शकता पण जर तुमचे काम रजिस्टर केले नसेल तर तुम्हीही ओरिजिनल वर्क तुमचेच आहे हे कोर्टात सिद्ध करू शकत नाही .




*मूळ कामाचे कॉपीराइट घेण्याचे फायदे -*

१) कॉपीराइट नोंदणी सार्वजनिक रेकॉर्ड तयार करते. हे जगाला सांगते की आपले कार्य कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे आणि आपल्याला शोधण्यासाठी आपल्या कामाचा परवाना घेऊ इच्छित व्यक्तीस देखील आपली माहिती पुरवते .

२) हे जर कोणी  आपल्या परवानगीशिवाय वापरलेल्या मूळ कामाचा मोबदला जर उपभोगत असेल तर त्याला कायद्याचा तगादा दाखवून आपले अधिकार सुरक्षित करू शकतो.

३)हे आपल्याला आपल्या कामाचे हक्क विकू किंवा पास करण्याची परवानगी देते.

४)हे आपल्याला आपल्या कामाचे रूप बदलण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, हे आपल्याला सिक्वेल बनविण्यास किंवा कार्य सुधारित करण्यास किंवा सुधारित करण्यास अनुमती देते.

 *कॉपीराइट नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे- *

इंडियन कॉपीराइट ऍक्ट, १९५७ अनुसार लागणारी कागदपत्र -

 १)काम प्रकाशित झाल्यास त्या कामाच्या 3 प्रती.

२) जर काम प्रकाशित झाले नाही तर हस्तलिखितांच्या दोन प्रती.

३)जर एखाद्या वकीलाद्वारे अर्ज दाखल केला जात असेल तर मुखत्यार आणि पक्षाद्वारे स्वाक्षरी केलेली विशेष पॉवर ऑफ अटर्नी किंवा वाकलात्नामा

४) कामाच्या संदर्भात अधिकृतता, जर काम अर्जदाराचे कार्य नसेल तर

५) कार्याचे शीर्षक आणि भाषेविषयी माहिती.

६) अर्जदाराचे नाव, पत्ता आणि राष्ट्रीयत्व याबाबतची माहिती

. ७) अर्जदाराने त्याचा मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता देखील प्रदान करणे आवश्यक आहे;

८) अर्जदार लेखक नसल्यास, लेखकाचे नाव, पत्ता आणि राष्ट्रीयत्व असलेले दस्तऐवज आणि जर लेखक हयात नसेल  तर त्याच्या मृत्यूची तारीख;

९) जर उत्पादनावर हे काम वापरायचे असेल तर ट्रेडमार्क कार्यालयातून ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

१०) जर कॉपीराइट सॉफ्टवेअरसाठी असेल तर स्त्रोत कोड आणि ऑब्जेक्ट कोड देखील आवश्यक आहे.

 @Adv. Dhanashree Dunakhe 

  1. http://copyright.gov.in/Documents/Check_List-WorkWise.pdf
  2. http://copyright.gov.in/Documents/CopyrightRules1958.pdf

No comments:

Post a Comment

कायदेविषयक प्रश्न - ३ घरघुती हिंसाचारामुळे गर्भधारणा संपुष्टात किंवा गर्भ वैद्यकीय मदतीने पाडता येतो का ?

कायदेविषयक प्रश्न - ३  घरघुती हिंसाचारामुळे गर्भधारणा संपुष्टात किंवा गर्भ वैद्यकीय मदतीने पाडता येतो  का ? सिद्रा मेहबूब विरुद्ध महाराष्ट्र...